अनेक नावीन्य उपक्रम राबविण्यात यशश्वी असलेली व्यापारी असोशिएशन
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :सिंदेवाही शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने सिंदेवाही मध्ये असलेल्या सर्व सिंडिकेट तसेच इतरत्र ठिकाणा वरून माल आल्यानंतर त्यांना खाली उतरवून दुकांनं पर्यंत आपल्या पाठीवर नेवून पोहचविण्याचे काम करित असल्याने अश्या मेहनती गरीब वेक्तीला म्हणजेच गॅरेज कामगारांना दिवाळी निमित्त भेट वस्तु हें “दिव्या ट्रेडर्स” च्या परिसरात व्यापारी असोशिएशनच्या कार्यकारणीच्या सर्व सभासदांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
अश्या प्रकारचे अनेक नावीन्य पूर्ण उप्रक्रम राबविण्यात सिंदेवाही मधील व्यापारी असोशिएशन टीम यशश्वी झालेली आहे. त्यामुळे सिंदेवाही मध्ये सगळीकडे या टीमचे कौतुक होत आहे.
शहरातील प्रत्येक कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्तिक एकादशीचे निमित्याने औचित्य साधून बुधवार ला दुपारी 4. 00 वाजता दिवाळी भेट वस्तू दिव्या ट्रेडर्स चे परिसरात कार्यकारणी चे सर्व सभासदांचे हस्ते देण्यात आले. बाजारपेठेतील व्यवसायाचे दृष्टीने दुकानातील मालाची चढ-उतार करीत असतात. गॅरेजने आलेल्या सामानाची दुकानापर्यंत व दुकानातून गॅरेज दुकानापर्यंत पोहचवत असतात. व्यवसायात वृद्धीसाठी कामगारांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून व्यापारी असोसिएशनच्या कार्यकारणी चे हस्ते आनंदाची भेट कामगारांना नेहमी प्रमाणे दिवाळी भेटवस्तु वितरित केली जातात. यावेळी कार्यकारणी चे अध्यक्ष दिलीप दुस्सावार ,सचिव श्याम छत्रवाणी ,संदीप बांगडे, अनुप श्रीरामवार, गजेंद्र देवगिरकर, चेतन सूचक, बाबाजी भवानी, सुधीर कुडकेलवार , संदीप चेन्नुरवार, राजू नरडे, तसेच कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.