दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गोरगरिबांसाठी दोन्ही डॉ. पती पत्नी खोब्रागडे परिवार यांच्या वतीने अविरत निशुल्क उपचार शिबीर.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
दि.25 डिसेम्बर 2024 ला “स्त्रीमुक्ति दिनाच्या “निमित्याने मौजा रत्नापुर-शिवनी उमानदीघाट येथे भव्य बौद्ध धम्म प्रबोधन समारोह घेण्यात आला.त्याप्रीत्यर्थ “सिद्धांत हॉस्पिटल ” नवरगाव येथील डॉ. दीपक खोब्रागडे ,डॉ. रोहिणी खोब्रागडे तर्फे मोफत रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले .शिबिरामधे 400 चे वर स्त्रीपुरुष, बालकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले .शिबिरामधे फार्मासिष्ट विरेन्द्र पिलेवान ,फार्मशिष्ट रविचंद्र नागदेवते तसेच सिद्धांत होस्पिटलचे कर्मचारी मोनिका मांदाले ,प्रीति नेवारे, संजना परसरामे , सुजल खानोरकर ह्यांनी आपली सेवा दिली . शिबिर यशस्विपने पार पाडन्याकारिता “धम्मभूमि विकास समिति रत्नापुर-शिवनिच्या ” सदश्यांनी “मोलाचे सहकार्य केले .


