नवरगावचे सुनील दादाजी चनबनवार यांचे ट्रॅक्टर असल्याची प्राथमिक माहिती
महसूल विभाग गाड झोपेत.
परिवारमधील एकुलता एक जवान मुलगा मृत पावल्याने आई वरती दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांना आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी परिवार तथा गाववासीय लोकांकडून होत आहे
अवैध धंदे वरती केव्हा बसणार आळा
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव :-आज दिनांक 04/04/2025 रोजी पहाटे सकाळी 5 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर क्र MH34BV4548 सुनील चनबनवार नवरगाव यांच्या मालकी असलेल्या ट्रॅक्टर ने मौजा रत्नापूर येथील पहाडीवरची अवैध रित्या कोणतेही रायल्टी नसताना दगड भरून आणत असताना ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडणारा हुक तुटल्याने ट्रॅक्टर ड्राइव्हर विलास तुळशीराम झोडे वय 25 रा. धुमनखेडा याच्या वरती ट्रॅक्टरचा मुडका पडल्याने जागेवरतीच मृत्यू झाला. रेती तसेच दगडाची अवैध वाहतूक सुरु असून या वाहतुकीत अनेक लोकांना आपलें जीव गमवावे लागत आहे.मात्र महसूल विभाग गाड झोपेत असून अनेकांचे जीव गमवावे लागत आहे. पुढील कार्यवाही मृतकाचे नातेवाईक यांच्या तोंडी रिपोर्ट वर गुन्हा नोंद करून पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विजय राठोड यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री सागर महल्ले करित आहेत.


