जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी मानले मनःपूर्वक आभार!!
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही – तालुक्यातील गुंजेवाही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला काही भेटवस्तु दान स्वरूपात परभणी जिल्ह्यातील भारूका या व्यक्तीने आमच्या शाळेला जवळपास चार -पाच लाखांचे भेटवस्तू स्वरूपात शाळेला दान दिले. प्राथमिक शाळेतील शिक्षिका शुभांगी वाणी मॅडम यांच्या सहकार्याने दुर्गाताई भारूका रा. परभणी यांनी शाळेला कंप्युटर, कलर प्रिंटर, टेबल, खुर्ची, टीव्ही, पंखा, लॅपटॉप, साठी चार -पाच लाखांचे आदी साहित्य भरघोस वस्तू दान स्वरूपात दिल्याबद्दल गावाकऱ्याने वतीने तसेच ग्रामपंचायत च्या वतीने दुर्गाताई भारूका यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तसेच मनःपूर्वक आभार.. गोरगरीब, वंचित उपेक्षित व शोषित घटकाच्या मदतीसाठी ही दुर्गाताई भारूका हे सदैव तत्पर असतात. या मदतीचा विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोग करणार असल्याचे सर्व शिक्षक यांनी सांगितले.
दुर्गाताई भारूका यांच्या माध्यमातून दिलेल्या सर्व साहित्याचे फीत कापण्यात आले. यावेळी सरपंच, सदस्य, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.शालेय सर्वांगीण विकासासाठी व
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी
शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांमध्ये शाळेची चांगली प्रगती व्हावी हा दृष्टीकोन ठेऊन शाळेचे शिक्षक अत्यंत उत्कृष्ट कार्य करीत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक रामटेके सर, शुभांगी वाणी मॅडम, सुरणार मॅडम, व सर्वच शिक्षिकेतर कर्मचारी अगदी स्वतःच्या कुटुंबंप्रमाणे कार्य करीत असल्याने त्या कार्याचे कौतुक करून असून मनःपूर्वक शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.


