गोरगरीब महिलांना रोजगार देऊन केले त्यांचे उदर निर्वाह
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव:- महीलांच्या उत्थानासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्या सुनिता मेश्राम यांच्या कार्याची दखल घेऊन तहसील कार्यालय सिंदेवाही च्या वतीने जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून १० मार्च ला सन्मानीत करण्यात आले.
२००८ मध्ये काही महीलांना एकत्र करुन यशस्वी महिला बचत गट सुरु केला. मासिक बचत जमा करणे व जमा झालेली रक्कम व्याजाने देणे यावरच न थांबता कर्ज घेऊन, स्वतः प्रशिक्षीत होऊन २०१३ मध्ये पञावळी गृहउद्योग सुरु केला. काही काळातच घेतलेले संपूर्ण कर्जाची परतफेड केली. शिवाय झालेल्या नफ्यातुन खेळते भांडवल बाजुला ठेऊन उर्वरीत रक्कम सदस्यांमध्ये वाटली जाते. त्यामुळे या व्यवसायातुन आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवीला. कुठलेही मतभेद न करता आजही त्याच जिद्दीने व्यवसाय सुरू आहे. सदर गट, समुह इतरांनाही प्रेरणादायी ठरत आहे.
यासह सामाजिक कार्यातही त्या सक्रीय असुन त्यांच्या कार्याची दखल सिंदेवाही तहसील प्रशासनाने घेतली आणि जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून १० मार्च ला तहसीलदार संदीपजी पानमंद यांच्या हस्ते व नायब तहसीलदार मंगेशजी तुमराम, तालुका पुरवठा अधीकारी शरदजी लोखंडे, निराधार योजनाधीकारी रंजीतजी देशमुख, निवडणुक अधीकारी वाहाणे यांच्या उपस्थितीत रत्नापूर येथील सुनिता दिलीप मेश्राम यांना शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समुहातील महीलांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.


