श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-एच.एस.सी 2025 चा नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सर्वोदय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही चा विज्ञान शाखेचा निकाल 98.1% तर कला शाखेचा 74.10 % निकाल लावून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली. विज्ञान शाखेत कु. राशी प्रवीण कोलप्याकवार हिने 84 टक्के गुण मिळवून सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही तसेच सिंदेवाही तालुक्यातून प्रथम आली. कला शाखेमधून अनिकेत पटवाळू मेश्राम याला ८३.५० टक्के गुण मिळवून हा सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेतून प्रथम तर प्रीतम जगदीश गायकवाड याने 82.17% मिळवुन कला शाखेतून दुसरा आला. प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री योगेंद्र जयस्वाल तसेच संस्थेचे सचिव श्री अरविंद जी जयस्वाल सर्व संचालक मंडळांनी , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केकरे सर, पर्यवेक्षक सुकारे सर ,बांगडे मॅडम, सेमसकर सर ,भवानी सर, प्रदिप मेश्राम सर ,खुणे सर, मंदेवार मॅडम सगळाम मॅडम, साखरे सर, चिंतलवार सर,तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


