तीन नगरसेवकांचे सुद्धा अतिक्रमण मध्ये येत असलेले दुकान हटविले
नगरपंचायतचे अधिकारी तसेच सिंदेवाहि पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विजय राठोड स्वतः उपस्तित होते
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही नगरपंच्यात मध्ये येत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात अनेक लोकांनी आपापले दुकाने रस्त्यावरती थाटून अतिक्रमण केले असल्याने अनेक लोकांना तिथून जाणे येणे करिता अनेक समश्याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक नागरिक त्रासून गेले होते. मात्र आता चक्क नगरपंचायतच्या समितीने तसेच कर्मचारी यांनी चांगलाच अतिक्रमण विरुद्ध बडगा उभारल्याने अतिक्रमण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
नगरपंच्यातने कोणताहि भेदभाव नं करता स्वतः नगरसेवक असलेल्या लोकांचे सुद्धा अतिक्रमण काढले हे विशेष. त्यामुळे सिंदेवाही मधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून. आता रहदारीचे रस्ते मोकळे झाले आहे.अशीच कार्रवाही शेवट पर्यंत राहावी अशी मागणी सिंदेवाही येथील नागरिकांकडून होत आहे.


