प्रकाश पा. बनसोड यांची मागणी.
श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- शेतकऱ्यांच्या हिताची असलेली एकमेव बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर. येणाऱ्या काही दिवसातच या बँकेची निवडणूक लागणार असून पूर्वी जिल्ह्यातील सर्वच सेवा सहकारी संस्थांना निवडणूक लढविण्याचा अधिकार होता. मात्र २०२१ चे विशेष सभेमध्ये ऑडिट वर्ग “क” मधील पोटनियम मध्ये दुरुस्ती करून सर्व सेवा सहकारी संस्था यांचा निवडणूक लढविण्याचा अधिकार काढण्यात आला असल्याने जिल्ह्यातील ९५ टक्के सेवा सहकारी संस्था निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष यांनी एक तातडीची विशेष सभा घेऊन “क” वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळावा असा प्रस्ताव विभागीय सहनिबंधक कार्यालय येथे पाठवून पाठपुरावा करावा. आणि मंजुरी प्राप्त करून घ्यावी. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथील निवडणुकीसाठी जिल्हाभरातील अ, ब, आणि क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना प्रतिनिधित्व करता येत होते. परंतु मार्च २०२१ चे विशेष सभेमध्ये ऑडिट वर्गाचा ठराव घेऊन तो मंत्रालयात पाठविण्यात आला. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्याधिकारी कल्याणकर यांनी तशा प्रकारचे शपथपत्र सुध्दा करून दिलेले आहे. सेवा सहकारी संस्थांना पोटनियम बदलास विभागीय सहनिबंधक यांचेकडून अजून पर्यंत कळविण्यात आले नाही. तसेच क” मधून ब” आणि ब मधून अ” ऑडिट वर्गात संस्था येण्यासाठी पर्यायी उपाययोजना व प्रशिक्षण सहकार खात्याने व बँकेने सुचविले नाही. त्यामुळे ९५ टक्के सेवा सहकारी संस्थांचा ऑडिट वर्ग “अ” आहे. क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना निवडणूक लढविण्याचा अधिकार काढून टाकला असल्याने जिल्हा बँकेवर आपली एकहाती सत्ता असावी, आपण बँकेवर कायम अविरोध निवडून यावे. यासाठी तर जिल्ह्यातील “क” वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आले नसावे ? असाही प्रश्न प्रकाश बनसोड यांना पडलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी रावत यांनी जिल्ह्यातील “क” वर्गाच्या सेवा सहकारी संस्थावर होणारा अन्याय लक्षात घेऊन तातडीची विशेष सभा घेऊन जिल्ह्यातील ऑडिट वर्ग “क” च्या सर्व सेवा सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त होण्याचा प्रस्ताव तयार करून विभागीय सहनिबंधक कार्यालय येथे पाठवावा. आणि पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त करावी. अशी मागणी प्रकाश बनसोड यांनी केली आहे.


