श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्य भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्य “घर घर संविधान कार्यक्रम” सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, शिक्षक कॉलणी सिंदेवाही येथे साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. भास्कर श्रावण नन्नावार, अध्यक्ष सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत तसेच कार्यक्रमाला विशेष अतिथी संविधान विषयक मार्गदर्शक मा. श्रीमती संघमित्रा ढोके, विभागीय सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभाग नागपूर होते. प्रमुख अतिथी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री राहूल कंकाळ, नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष सौ. पुजा विलास रामटेके, सार्वजनिक बांधकाम व नियोजन सभापती श्री मयूर रमेश सुचक, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती सौ. अंजूताई नरेंद्र भैसारे, महिला व बाल्यकल्याण समितीचे सभापती सौ. वैशालीताई संजय पुपरेड्डीवार, नगरसेवक श्री किशोर भरडकर, श्री सुनिल उट्टलवार, श्री युनूस शेख, सौ. स्वेता मोहुर्ले, सौ. दिपा पुस्तोडे, श्रीमती मिनाक्षी मेश्राम, सौ. अपूर्वा चिंतलवार, प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला दिपप्रज्वल व माला अर्पण करुन करण्यात आले. त्यांनतर मा. श्रीमती संघमित्रा ढोके, विभागीय सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभाग नागपूर यांना प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्याबद्दल सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीकडून शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रातील बहूसंख्य नागरीक, महाविद्यालयीन विद्यार्थी व अंगणवाडी सेविका मोठया संख्यानी उपस्थित होते. उपस्थित नागरीकांना, विदयार्थ्यांना व अंगणवाडी सेविकांना भारतीय संविधानाची प्रास्ताविका उपस्थित मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान विषयक मार्गदर्शक मा. श्रीमती संघमित्रा ढोके, विभागीय सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभाग नागपूर यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजातील प्रत्येक घटकांस संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये, मूलभूत हक्क, कर्तव्ये, विविध तरतुदीचे शिक्षण, भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार, संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करुन दिले. संविधानाबाबत प्रबोधनात्मक विस्तृत मार्गदर्शन केले. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत अध्यक्ष मा. भास्कर श्रावण नन्नावार, यांचे अध्यक्षनीय भाषण केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक मुख्याधिकारी, श्री राहूल कंकाळ यांनी केले व सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक श्री युनूस शेख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यास नगर अभियंता श्री मनोज आंबोरकर, प्रशासकीय अधिकारी श्री विजय किरवले, पाणी पुरवठा अभियंता श्री नुतन कोरडे, लेखापाल श्री सुरज गायकवाड, आरोग्य निरीक्षक श्री अनिकेत मानकर, लिपीक टंकलेखक श्री विनोद काटकर, श्री सुधिर ठाकरे, श्री संजय वाकडे, श्री संजय रामटेके, श्री पुरुषोत्तम खोब्रागडे, श्री संदीप कांबळे, कु. दिपलता पातोडे, श्री दिलेश सहारे श्रीमती गिता नागापूरे, संगिता कंबलवार, सौ. नंदा रगडे व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


