ग्राहक पंचायत महाराष्ट्रची सिंदेवाही शाखा स्थापन
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316 सिंदेवाही– आज दिनांक 01.06.2025 रोज रविवारला सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृह सिंदेवाही येथे ‘”ग्राहक पंचायत महाराष्ट्र “यांच्या वतीने आयोजित सभेत मा. श्री. परशुरामजी तुंडूलवार यांच्या अध्यक्षते खाली ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंदेवाही तालुका शाखा स्थापन करण्यात आली व खालील कार्यकारिणी गठित करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे संस्थापक स्व. बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून सभेची सूरूवात झाली. व ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” तालुका सिंदेवाही शाखा खालील प्रमाणे स्थापन करण्यात आले.
अध्यक्ष – प्रशांत देवकुमार गेडाम
उपाध्यक्ष – श्रीकांत केशव हेडावू
संघटक- अमन आफताब कुरेशी
सहसंघटक- तेजेंद्र रामदास नागदेवते
सचिव -आक्रोश वामन खोब्रागडे
सहसचिव -अमोल सेवादास निनावे
कोषाध्यक्ष -शरद वसंत नैताम
सदस्य -प्रतीक रमेश ठेमस्कर
प्रवीण नागदेवते
सभेला विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा संघटक देविदास नंदनवार, जिल्हा उपाध्यक्ष अरूण जमदाडे, जिल्हा सल्लागार सुनील पाचखेडे सर व चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष दिलीप गड्डमवार प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक तथा संचालन सहसचिव अमोल निनावे यांनी केले ,सचीव आक्रोश खोब्रागडेयांनी आभार प्रदर्शन केले.
नवनिर्वाचित सिंदेवाही टीम यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.


