घातपात करण्याच्या बेताने तलवार हातात तर नाही घेतली नं
अखेरीस ती तलवार त्या युवकाच्या हातात आली कशी?
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:-सिंदेवाही मध्ये वारंवार युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवूत्ती आढळून येताना दिसत आहे. या अगोदर अनेक शिक्षणातील युवक जेल मध्ये जाऊन आले असताना आणखी अश्याच दहशती निर्माण करून गुन्हेगार बनताना आढळून येत आहे. दिनांक 17/06/2025 ला सिंदेवाही येथील नवीन बस स्टॉप जवळ आरोपी शिवराज सुनील उटलवार वय 24 वर्ष रा. सिंदेवाही हा मुलगा हातात तलवार घेउन संशहित रित्या सिंदेवाही पोलिसांना पोट्रोलिंग दरम्यान मिळून आल्याने त्यास त्याब्यात घेऊन अप क्र. 213/2025 कलम 4,25, भा.ह.का सह कलम 122 मपोअ अनवे गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली. सदरची कार्यवाही मुमका सुदर्शन सा. अपर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम उपविभागीय अधिकारी ठोसरे सा. यांच्या मार्गदर्शनातं पो. नि राठोड सा. यांच्या नेतृत्वात सफो. सोनवणे, पो अ. पंकज मरस्कोल्हे यांनी केली. पुढील तपास चालू आहे.
सिंदेवाही मधील अनेक युवक बेरोजगार असून अनेक युवक नशेच्या आहारी गेले असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे सिंदेवाही मधील पोलीस प्रशाशनाने तसेच स्वतः पालक वर्ग याकडे आवर्जून लक्ष्य द्यावे व गुन्हेगारी कमी करावी अशी मागणी आता सिंदेवाही वाशीय जनतेकडून होत आहे.


