सिंदेवाहीतील किशोर पाटील यांचा जागीच मृत्यू
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांचा शनिवारी १९ जुलै रोजी वाढदिवसा असल्याने सिंदेवाही येथील बंटी भांगडिया यांचे कार्यकर्ते किशोर पाटील ( ५०) हे इतर कार्यकर्त्यांसह शुक्रवारी रात्री आठ वाजताचे दरम्यान बॉम्बेसेल जवळील दीपक सूचक यांचे घरावर बॅनर लावत असताना अचानक बॅनरचा टोल जिवंत तारांवर गेला. आणि त्यातच किशोर पाटील यांचा मृत्यू झाला असल्याने सिंदेवाही शहरासह ग्रामीण भागात सुद्धा हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे इंद्रजीत सोनवणे यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीनुसार घटनेच्या दिवशी रात्री ८ ते साडे आठ चे दरम्यान तक्रारदार सह मृतक किशोर पाटील, जितेंद्र कुमार टुणटुणाती, वेदांत व साहिल, हे सर्व मिळून शहरातील दीपक सूचक यांचे घरावर चढून, आणि खाली दोन माणसे सोडून चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे १० बॉय १५ फूट लांबी रुंदीचा लोखंडी एंगल लावलेला बॅनर लावण्याचे काम करीत होते. सदर बॅनर खालून वरती ओढत असताना स्लॅब लेवल पर्यंत गेल्यावर अचानक बॅनरची दिशा बदलली आणि तेथील विद्युत् तारांना बॅनरचा स्पर्श झाला. त्यामध्ये किशोर पाटील आणि जितेंद्र कुमार यांना विद्युत करंट लागल्याने किशोर पाटील हे जागीच पडले. आणि जितेंद्र कुमार हे दुसऱ्या ठिकाणी पडले. त्यामुळे सहकारी इंद्रजीत यांनी किशोर पाटील यांना आवाज दिला. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आरडाओरड करून खाली असलेल्या माणसांना बोलवून किशोर यांना जवळच्या खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र तेथील डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात नेण्याचे सांगितल्याने लगेच किशोर यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून किशोर यांना मृत घोषित केले.
किशोर पाटील हे सिद्धिविनायक राईस मिल मध्ये दिवाणजी म्हणून काम करीत होते. तसेच ते भाजपा कार्यकर्ते हितेश सूचक यांचे खंदे समर्थक सुद्धा होते. ते शहरातील सर्वांसोबत अत्यंत प्रेमाने वागत असून त्यांचे पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. घरचा कमवता व्यक्ती गेल्याने किशोर पाटील यांचे पत्नीवर खूप मोठा आघात झाला आहे. शुक्रवारी त्यांचे प्रेताचे शवविच्छेदन करून दुपारी २ वाजता सिंदेवाही येथील स्मशानभूमीत त्यांचे प्रेत पुरण्यात आले. यावेळी शहरातील सर्व व्यापारी वर्ग, राजकीय कार्यकर्ते, आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.


